Godavari Aarti Handwriting | गोदावरी आरती हस्ताक्षर

“गोदावरी आरती हस्ताक्षर” उपक्रम काय आहे?

आधुनिक तंत्रज्ञान युगातही सुंदर हस्ताक्षरांचे महत्व टिकून राहावे, हाताला छान वळण लागावे, आपल्या हस्तलिपीचे संवर्धन व प्रचार प्रसार व्हावा यासाठी "गोदावरी आरती हस्ताक्षर" या उपक्रमांतर्गत आपण स्वतःच्या सुंदर हस्ताक्षरांत गोदावरी आरती लिहिणार आहोत.


उपक्रमात का सहभागी व्हावे?

"गोदावरी आरती" हे एक साहित्यिक कलात्मक तंत्रज्ञानात्मक शैक्षणिक सांस्कृतिक संस्कारक्षम व्यासपीठ आहे.

 • हस्ताक्षरांत लिहिण्यामुळे एक उत्तम बौद्धिक-मानसिक व्यायाम होतो, मोटर कौशल्य (हात-डोळे सुसूत्रता), आत्मविश्वास, एकाग्रता, बुद्धी वृद्धिंगत होण्यास मदत, आठवणींना उजाळा, आणि नवनिर्मितीचा आनंद होतो.
 • साहित्यिक दृष्टीने विचार करता - पद्य निर्मिती, संस्कृतप्रचुर शब्द, भाषा रचना, व्याकरण तसेच छंद, वृत्त यांचा अभ्यास होतो.
 • तांत्रिक दृष्टीने विचार करता - वेबसाईट उघडणे, रेकॉर्ड करणे, अपलोड, डाउनलोड, हॅशटॅग, शेअर करणे यासारखी कौशल्यं विकसित होतात.
 • आणि सर्वात महत्वाचे म्हणजे - माता गोदावरीचे पाणी आपण रोज प्राशन करतो, वापरतो. त्यामुळे माता गोदावरीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची हि एक अनोखी संधी आहे.

 • कोणास सहभागी होता येईल?

  "गोदावरी आरती" उपक्रमात खाजगी तसेच सरकारी संस्था, शाळा, प्रशिक्षण-संस्था, विद्यार्थी, शिक्षक, पालक अर्थातच प्रत्येक नागरिकांस आपल्या कला सादरीकरणासह सहभाग घेता येईल.


  कसे सहभागी होता येईल?

  उपक्रमात सहभागी होण्यासाठी खालीलप्रमाणे कृती करा.


  खालील मार्गदर्शनपर व्हिडीओ बघा.


  गोदावरी आरती हस्ताक्षरांत लिहीतानाचा तुमचा विडिओ रेकॉर्ड करा.

  Recording format:

  Media Stream Constraints options

  Echo cancellation:

  इतर पर्याय [Other Options]

  व्हिडीओ रेकॉर्ड करणे शक्य नसल्यास गोदावरी आरती हस्ताक्षरांत लिहीतानाचे तुमचे फोटो सुद्धा पाठवू शकता, परंतु स्पर्धेच्या दृष्टीने व्हिडीओला प्रथम प्राधान्य दिले जाईल.

  This page requires Firefox 29 or later, or Chrome 47 or later. Download/Update Chrome


  आपला रेकॉर्डेड व्हिडीओ अथवा फोटोज् स्वतःच्या युट्युब चॅनेल्स, वेबसाईट, ब्लॉग्ज, व्हॉट्सअँप, फेसबुक, इंस्टाग्राम किंवा इतर सोशिअल मेडियावर #godavariaarti हा हॅशटॅग देऊन आपल्या मित्र-परिवारांमध्ये शेअर करा.


  आपल्या स्वयंस्फूर्त योगदानाबद्दल योग्य तो गुणवत्ता दर्जा तपासल्यानंतर "गोदावरी आरती" सहभाग प्रमाणपत्र डिजिटल स्वरूपात प्रदान करण्यात येईल. "गोदावरी आरती" हा उपक्रम स्पर्धा नाही, तरीदेखील उत्तेजनार्थ सर्वाधिक संस्था / शाळा / कला-प्रशिक्षण-संस्था सहभाग अनुक्रमे प्राचार्य, कला शिक्षक प्रमाणपत्र, सर्वोत्तम शिक्षक / विद्यार्थी / पालक, अशा प्रवर्गानुसार योग्य वेळी प्रमाणपत्र प्रदान करण्यात येतील. "गोदावरी आरती" उपक्रम सहभाग प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अर्ज करा.  गोदावरी आरती" उपक्रमांतर्गत किमान १ लक्ष लोकसहभागाचे उद्दिष्ट आहे. कृपया, यात आपण सक्रिय सहभागी व्हावे आणि "गोदावरी आरती" हा अभिनव उपक्रम #godavariaarti हॅशटॅगसह अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवून योगदान करावे अशी नम्र विनंती. धन्यवाद!


  मुखपृष्ठ [Home] | गायन-वादन-नर्तन [Singing-Playing-Dancing] | पुस्तिका [Booklet] | हस्ताक्षर [Handwriting] | प्रश्नमंजुषा [quiz] | व्हिडीओ निर्मिती [Video Making] | नवकल्पना [Innovations] | Terms | Policy | Contact