Godavari Aarti Singing-Playing-Dancing | गोदावरी आरती गायन-वादन-नर्तन

"गोदावरी आरती गोदावरी आरती गायन-वादन-नर्तन" उपक्रम काय आहे?

साहित्य, संगीत, तंत्रज्ञान आणि लोकसहभाग या माध्यमांतून माता गोदावरीचे भौगोलिक, पौराणिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक तसेच व्यावहारिक महत्त्व समजून घेण्यासाठी, पाणी व पाणीप्रश्न याबाबत लोकशिक्षण व्हावे या उद्देशाने सदर उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.


"गोदावरी आरती" उपक्रमात का सहभागी व्हावे?

"गोदावरी आरती" हे एक साहित्यिक कलात्मक तंत्रज्ञानात्मक शैक्षणिक सांस्कृतिक संस्कारक्षम व्यासपीठ आहे.

 • सांगितिक दृष्टीने विचार करता - ताल, सूर, लय, ठेका, वाद्य, गायनपट्टी, माईक / कॅमेरा समज तसेच कराओके यांचा अभ्यास होतो.
 • साहित्यिक दृष्टीने विचार करता - पद्य निर्मिती, संस्कृतप्रचुर शब्द, भाषा रचना, व्याकरण तसेच छंद, वृत्त यांचा अभ्यास होतो.
 • तांत्रिक दृष्टीने विचार करता - वेबसाईट उघडणे, रेकॉर्ड करणे, अपलोड, डाउनलोड, हॅशटॅग, शेअर करणे यासारखी कौशल्यं विकसित होतात.
 • नवकल्पकता दृष्टीने विचार करता - मोटर कौशल्य (हात-डोळे सुसूत्रता), आत्मविश्वास, एकाग्रता, संघ-भावना वाढीस लागते आणि नवनिर्मितीचा आनंद होतो.
 • गोदावरी नदीचा उगम, संगम, उंची, लांबी, परिसर, पाच राज्यांतील तिचा प्रवास, विविध आख्यायिका, धरणं, तीर्थक्षेत्रें, तिची नांवें यांविषयीचे सामान्यज्ञान प्राप्त होते.
 • आणि सर्वात महत्वाचे म्हणजे - माता गोदावरीचे पाणी आपण रोज प्राशन करतो, वापरतो. त्यामुळे माता गोदावरीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची हि एक अनोखी संधी आहे.

 • "गोदावरी आरती" उपक्रमात कोणास सहभागी होता येईल?

  "गोदावरी आरती" उपक्रमात खाजगी तसेच सरकारी संस्था, शाळा, संगीत/कला-प्रशिक्षण-संस्था, विद्यार्थी, शिक्षक, पालक, गायक, वादक, नर्तक, चित्रकार व अन्य व्यावसायिक कलावंत अर्थातच प्रत्येक नागरिकांस आपल्या कला सादरीकरणासह सहभाग घेता येईल.


  "गोदावरी आरती" उपक्रमात कसे सहभागी होता येईल?

  "गोदावरी आरती" उपक्रमात सहभागी होण्यासाठी आपल्या आवाज (vocal) किंवा वाद्य (instrumental) स्वरूपात, व्यक्तिगत (individual), युगल (duet) किंवा सामूहिक (group) पद्धतीने "गोदावरी आरती" रेकॉर्ड करावी. त्यासाठी खालीलप्रमाणे कृती करा.


  खालील नमुनादाखल सादर केलेल्या गोदावरी आरत्या ऐका.

  Vocal, Duet

  Artist: Shraddha Mali & Nilesh Mhatre

  Vocal, Female

  Artist: Shraddha Mali

  Vocal, Male

  Artist: Nilesh Mhatre

  Vocal, Male

  Artist: Shripad Khairnar

  Vocal, Male

  Artist: Sachin Chandratre

  Listen to more ..

  Godavari Aarti Radio

  24x7 Godavari Aarti

  Godavari Aarti Radio Station


  खालील नमुनादाखल सादर केलेल्या गोदावरी आरत्या पहा.


  रेकॉर्ड करण्यापूर्वी "गोदावरी आरती" च्या खालील karaoke ट्रॅक सोबत अधिकाधिक सराव करा.


  आपल्या सोईनुसार ऑनलाईन किंवा ऑफलाईन ऑडिओ किंवा व्हिडीओ पर्याय निवडून रेकॉर्ड करा. "गोदावरी आरती" उपक्रमाची व्यापकता लक्षांत घेता, आपली कला सादरीकरणाचे हे एक उत्तम व्यासपिठ होऊ शकते. त्यामुळे आरती रेकॉर्ड करताना गुणवत्ता दर्जाकडे अधिक लक्ष द्यावे. स्मार्टफोन किंवा संगणक यावर आवाजबंद खोलीत किंवा शक्य असल्यास स्टुडिओमध्ये "गोदावरी आरती" उच्चप्रतीचा ऑडिओ किंवा व्हिडीओ रेकॉर्ड करावा. आपल्या रेकॉर्डेड आरतीचा योग्य तो गुणवत्तादर्जा तपासून आपल्या परवानगीने ती सदर संकेतस्थळावर आपल्या नावांसह सार्वजनिकरित्या प्रदर्शित करण्यात येईल.

  Recording format:

  Media Stream Constraints options

  Echo cancellation:

  इतर पर्याय [Other Options]

  This page requires Firefox 29 or later, or Chrome 47 or later. Download/Update Chrome


  आपली रेकॉर्डेड गोदावरी आरती स्वतःच्या युट्युब चॅनेल्स, वेबसाईट, ब्लॉग्ज, व्हॉट्सअँप, फेसबुक, इंस्टाग्राम किंवा इतर सोशिअल मेडियावर #godavariaarti हा हॅशटॅग देऊन आपल्या मित्र-परिवारांमध्ये शेअर करा.


  आपल्या स्वयंस्फूर्त योगदानाबद्दल योग्य तो गुणवत्ता दर्जा तपासल्यानंतर "गोदावरी आरती" सहभाग प्रमाणपत्र डिजिटल स्वरूपात प्रदान करण्यात येईल. "गोदावरी आरती" हा उपक्रम स्पर्धा नाही, तरीदेखील उत्तेजनार्थ सर्वाधिक संस्था/शाळा/ संगीत/कला-प्रशिक्षण-संस्था सहभाग अनुक्रमे प्राचार्य, संगीत शिक्षक प्रमाणपत्र, सर्वोत्तम शिक्षक, सर्वोत्तम विद्यार्थी, सर्वोत्तम पालक, सर्वोत्तम गायक, सर्वोत्तम वादक अशा प्रवर्गानुसार योग्य वेळी प्रमाणपत्र प्रदान करण्यात येतील. "गोदावरी आरती" उपक्रम सहभाग प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अर्ज करा.  गोदावरी आरती" उपक्रमांतर्गत किमान १ लक्ष लोकसहभागाचे उद्दिष्ट आहे. कृपया, यात आपण सक्रिय सहभागी व्हावे आणि "गोदावरी आरती" हा अभिनव उपक्रम #godavariaarti हॅशटॅगसह अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवून योगदान करावे अशी नम्र विनंती. धन्यवाद!


  मुखपृष्ठ [Home] | गायन-वादन-नर्तन [Singing-Playing-Dancing] | पुस्तिका [Booklet] | हस्ताक्षर [Handwriting] | प्रश्नमंजुषा [quiz] | व्हिडीओ निर्मिती [Video Making] | नवकल्पना [Innovations] | Terms | Policy | Contact