गोदावरी आरती व्हिडीओ निर्मिती स्पर्धा

Godavari Aarti Video Making Competition | गोदावरी आरती व्हिडीओ निर्मिती स्पर्धा

“गोदावरी आरती व्हिडीओ निर्मिती” या उपक्रमांतरागत स्पर्धक www.godavariaarti.org वेबसाईटवर दिलेला गोदावरी आरतीचा अधिकृत संगीत ट्रॅक व श्लोक वापरून आरतीतील शब्दांना समर्पक अशा चल/स्थिर चित्रांचा (फोटो तसेच व्हिडिओ) चा वापर करून आकर्षक व्हिडीओ बनविणार आहेत, मात्र व्हिडीओ बनवितांना वापरलेले फोटो / व्हिडीओ स्वतः काढलेले किंवा मालकीहक्क विरहित (copyright free) असावेत. व्हिडीओ गुगल ड्राइव्ह वर अपलोड करून त्याची लिंक [email protected] या ईमेलला शेअर करावी. उपक्रमात सहभागी होण्यासाठी खालीलप्रमाणे कृती करा.

1. पहा [watch]: मार्गदर्शनपर व्हिडीओ बघा.

2. शेअर करा [Share]: आपला रेकॉर्डेड व्हिडीओ अथवा फोटोज् स्वतःच्या युट्युब चॅनेल्स, वेबसाईट, ब्लॉग्ज, व्हॉट्सअँप, फेसबुक, इंस्टाग्राम किंवा इतर सोशिअल मेडियावर #godavariaarti हा हॅशटॅग देऊन आपल्या मित्र-परिवारांमध्ये शेअर करा.

3. प्रमाणपत्र मिळवा [Get Certificate]: आपल्या स्वयंस्फूर्त योगदानाबद्दल योग्य तो गुणवत्ता दर्जा तपासल्यानंतर “गोदावरी आरती” सहभाग प्रमाणपत्र डिजिटल स्वरूपात प्रदान करण्यात येईल. “गोदावरी आरती” उपक्रम सहभाग प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अर्ज करा.